tv9 Marathi Special Report | मराठी अनिवार्यतेला विरोध; रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा, मराठी न येणाऱ्यांचे परवाने सरकार रद्द करणार?
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या सक्तीच्या निर्णयावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील रिक्षा व टॅक्सी चालकांवर मराठी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयाला काही संघटनांकडून विरोध होत असल्याचं चित्र समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे 14 लाख रिक्षाचालकांनी 4 मेपासून संपावर जाण्याचा इशारा सरकारला दिला आहे.
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या सक्तीच्या निर्णयावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील रिक्षा व टॅक्सी चालकांवर मराठी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयाला काही संघटनांकडून विरोध होत असल्याचं चित्र समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे 14 लाख रिक्षाचालकांनी 4 मेपासून संपावर जाण्याचा इशारा सरकारला दिला आहे. सरकारने नुकताच घेतलेल्या निर्णयानुसार, मोटार परिवहन विभागाकडून परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान चालकांना मराठी वाचता आणि लिहिता येतं का?, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषा न येणाऱ्या चालकांवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका मांडत, राज्यात काम करणाऱ्या चालकांना स्थानिक भाषा येणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. मात्र, या निर्णयाला अमराठी रिक्षाचालकांकडून तीव्र विरोध होत असून, संभाव्य संपामुळे मुंबईसह आसपासच्या शहरांतील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
