महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार

| Updated on: Feb 25, 2026 | 1:30 PM

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. विधानसभेची सदस्य संख्या 286 असून, एका जागेसाठी 36 आमदारांचा कोटा आहे. महायुतीकडे 232 तर महाविकास आघाडीकडे 52 आमदारांचे संख्याबळ आहे. या गणितानुसार, मविआला एक जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महायुती अधिक जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. विधानसभेची सध्याची सदस्य संख्या 286 असून, प्रत्येक राज्यसभेच्या जागेसाठी 36 आमदारांचा मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संख्याबळाचे गणित मांडले जात आहे. महायुतीकडे एकूण 232 आमदारांचे संख्याबळ आहे. यामध्ये भाजपकडे करडीले यांच्या निधनानंतर 136 आमदार आहेत, ज्यांना तीन जागा निवडून आणण्यासाठी 108 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे आणि त्यांच्याकडे 28 अतिरिक्त मते उरतात. शिवसेनेकडे 56 आमदार असून, एक खासदार निवडून आणण्यासाठी त्यांना 36 मतांचा कोटा लागेल, ज्यामुळे त्यांच्याकडे 20 अतिरिक्त मते राहतील. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडे 40 आमदार असून, एक जागा मिळवण्यासाठी 36 मतांचा कोटा आवश्यक आहे आणि त्यांच्याकडे चार अतिरिक्त मते आहेत.

दुसरीकडे, महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 52 आमदारांचे आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडे 20 आमदार असून, एका जागेसाठी त्यांना १६ अतिरिक्त मतांची गरज आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 10 आमदार असून, एका जागेसाठी त्यांना 26 अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे. तर काँग्रेसकडे 16 आमदार असून, एका जागेसाठी त्यांना 20 अतिरिक्त मतांची गरज भासत आहे. संख्याबळानुसार, महाविकास आघाडीला एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published on: Feb 25, 2026 01:30 PM