राज्यसभेसाठी पवारांच्या जागेचा पेच? जागा 2 पक्ष 3, मविआत कोणाची कोंडी होणार?

राज्यसभेसाठी पवारांच्या जागेचा पेच? जागा 2 पक्ष 3, मविआत कोणाची कोंडी होणार?

राखी राजपूत | Updated on: Feb 20, 2026 | 9:41 AM

महाविकास आघाडीत राज्यसभेच्या दोन जागांसाठी तीन पक्षांमध्ये (ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस) तिढा निर्माण झाला आहे. शरद पवारांनी राज्यसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे ही चर्चा अधिक तीव्र झाली आहे. काँग्रेसने विधान परिषदेतील जागेसाठी अट घातल्याने, मविआत कोणाची कोंडी होणार आणि मैत्रीत कोण कुर्बानी देणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या जागा वाटपावरून सध्या मोठा पेच निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील सात राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ ४ एप्रिल रोजी संपत असल्याने या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये एकूण तीन पक्ष (ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस) असून, त्यांच्यासाठी केवळ दोन जागांवरच खासदार पाठवता येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, यावर काँग्रेसने एक अट घातल्याचे समोर आले आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, जर पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा दिला, तर विधान परिषदेच्या जागेसाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा मिळणार नाही. यामुळे महाविकास आघाडीत कुर्बानी कोण देणार? असा सवाल भाजपकडून विचारला जात आहे. आगामी महाविकास आघाडीच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

Published on: Feb 20, 2026 9:41 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us