शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार शाळांमध्ये उपस्थित
राज्यात विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या फुलांच्या वर्षावाने आणि ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले जात आहे. अशातच नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुणे जिल्ह्यातील शाळेत हजर होते.

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज १५ जूनपासून राज्यातील सर्वच शाळा सुरू झाल्या असून लहान-मोठ्या गावांमध्ये शाळेची घंटा वाजली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मनपा शाळांमध्ये हजर राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शाळेतील पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले आणि त्यांच्याशी संवादही साधला. पनवेलच्या वहाळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्यमंत्री फडणवीस विद्यार्थ्यांसोबत काही वेळ गप्पा-गप्पा मारत होते, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्हे येथे उपस्थित होत्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागतासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही ठाण्यातील मनपा शाळेत उपस्थित होते. इतकेच नाही तर त्यांनी विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटपही केले आहे.