मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना…

मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना…

| Updated on: Jun 27, 2026 | 4:10 PM

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षा सरकारने ऐनवेळी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पेपर फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. या परीक्षेला जवळपास 2 लाख 26 हजार उमेदवार बसणार होते. मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. ठाण्यातील पेपरफुटी प्रकरणात भिवंडीमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. कोनगाव पोलिसांनी सापळा रचून तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. राज्यातील 37 ठिकाणी 1728 केंद्रांवर जवळपास 6 लाख 125 विद्यार्थ्यांची परीक्षा होणार होती. मात्र पारदर्शक परीक्षा घेणे हेच मुख्य उद्दिष्ट असल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे.

Published on: Jun 27, 2026 4:10 PM
Follow Us