विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे… काय घडलं?

विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे… काय घडलं?

| Updated on: Jun 09, 2026 | 6:21 PM

नवी दिल्लीमध्ये आज राजकीय घडामोडींना वेग आला असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक पार पडली. या भेटीकडे देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

तृणमूल काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांच्यात जवळपास 45 मिनिटे सविस्तर चर्चा झाली. आगामी राजकीय रणनीती, विरोधकांची भूमिका तसेच राष्ट्रीय स्तरावरील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांमध्ये समन्वय वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर राजकीय चर्चांना आणखी उधाण आले असून पुढील काही दिवसांत महत्त्वाच्या राजकीय हालचाली घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 09, 2026 6:20 PM
Follow Us