‘देवेंद्र फडणवीस आमचं शत्रू नाहीत, पण मराठ्यांच्या विरोधात जाल तर…’, जरांगे पाटलांचा पुन्हा घणाघात

‘देवेंद्र फडणवीस आमचं शत्रू नाहीत, पण मराठ्यांच्या विरोधात जाल तर…’, जरांगे पाटलांचा पुन्हा घणाघात

Harshada Shinkar | Updated on: Aug 30, 2024 | 4:11 PM

जनतेची भावना देवेंद्र फडणवीस समजून घेत नाहीत. देवेंद्र फडणवीस काही आमचे शत्रू नाहीत परंतू ते काम देखील नीट करीत नाहीत. आम्हाला सहज घेताय. हिनविल्या सारखं बोलत आहेत. ते लोकशाहीत ते राजा आहेत, तुम्हाला लोकांची माया आली पाहिजे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

‘शेतकरी, धनगर बांधवांचे प्रश्न, ओबीसी बांधवांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत, मुस्लिम दलित लोकांसोबत तुम्ही तसेच वागणार हे योग्य नाही. वेळ आल्यास मग थातूरमातूर योजना काढून पुन्हा सत्तेवर बसणार… तुम्ही लोकांना वेड्यात काढताय हे लोकांना आता लक्षात येतंय’, असे वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसह देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. ओबीसीत मराठा आरक्षण असताना देखील ते आम्हाला आरक्षण देत नाहीत. अर्धा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, मराठ्यांच्या विरोधात जाल तर तुमचा पक्ष संपून जाईल. देवेंद्र मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मराठा आरक्षणावर काम करू देत नाहीत, हैदराबाद येथील नोंदी का आणू देत नाहीत..? राग येणारच तुम्ही मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मराठा आरक्षणावर काम करूच देत नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले. तर गुन्हे मागे घ्यायचे तर ते गुन्हे वाढतच चालले आहेत.तर सग्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची देखील अंमलबजावणी केली जात नाही. मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. जातिवंत मराठा भाजप पक्षात राहणार नाही आणि एकही माणसाला निवडून आणू येऊ देणार नाही असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Published on: Aug 30, 2024 4:11 PM
Follow Us