मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच…. कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले…

मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच…. कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले…

| Updated on: Sep 15, 2026 | 3:39 PM

१८ दिवसांच्या उपोषणानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्या अंतरवाली सराटी येथील निवासस्थानी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. सरकारने आरक्षणाच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात आणि त्यांचा जीव वाचवावा, अशी भावनिक विनंती त्यांची पत्नी आणि मुलीने केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १८ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्या या प्रवासापूर्वी अंकुश नगर येथील निवासस्थानी अत्यंत भावनिक दृश्य पाहायला मिळाले. जरांगे पाटलांना निरोप देण्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलगी तसेच गावातील अनेक महिला उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. जरांगे पाटलांच्या मुलीने सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. हे सरकारचे सर्वात मोठे अपयश असून, त्यामुळेच वडिलांना तिसऱ्यांदा मुंबईला जाण्याची वेळ आली असल्याचे तिने म्हटले.

तिने सरकारला विनंती केली की, त्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून त्यांची अंमलबजावणी करावी. फक्त कागदावर न ठेवता प्रत्यक्षात काम सुरू करावे. जरांगे पाटलांच्या पत्नीनेही सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारने मागण्या मान्य केल्या असत्या तर उपोषणाची आणि मुंबईला जाण्याची वेळच आली नसती, असे त्या म्हणाल्या. सरकारने मराठा समाजाचे दुःख समजून घेऊन यावर तोडगा काढावा, अशी भावनिक साद कुटुंबीयांनी घातली आहे.

Published on: Sep 15, 2026 3:39 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us