मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं, जरांगेंच्या 5 मागण्या कोणत्या?

मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं, जरांगेंच्या 5 मागण्या कोणत्या?

| Updated on: May 16, 2026 | 1:43 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापू लागले आहे. नुकतीच मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची ग्वाही दिली. महत्त्वाची बाब म्हणजे आधी झालेल्या आंदोलनानंतरही सरकारने विश्वासघात केल्याच्या मुद्द्यावर त्यांनी प्रकाश टाकला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी 30 तारखेपासून आंदोलन करण्याचे जाहीर केले. यावेळी जाणून घेण्यासारखी बाब म्हणजे, जरांगे पाटलांच्या मागण्या काय आहेत.

सर्वात पहिली मागणी म्हणजे, मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे आणि त्यांना ओबीसींच्या सर्व सवलती लागू कराव्यात. दुसरी, मराठा समाजाच्या ऐतिहासिक नोंदी तपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील ‘हैदराबाद गॅझेट’चा निर्णय पूर्णपणे अमलात आणावा. थांबलेले वाटप पूर्ण करावे, 29 तारखेच्या आत हे पूर्ण करावे.

तिसरी मागणी, मराठा बांधवांच्या रक्ताच्या नात्यातील (सगे-सोयरे) आणि विवाहाच्या नोंदी असलेल्या नातेवाईकांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश/GR लागू करण्यात यावा. सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध, मिरज, संस्थानचा प्रलंबित जीआर 1994 नुसार काढावा.

चौथी मागणी, मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या. पाचवी मागणी, आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला महावितरण आणि एमआयडीसीमध्ये नोकरीचा जीआर काढा.

Published on: May 16, 2026 01:10 PM
Follow Us