Marathi Language | मराठी वर्किंग नॉलेज बंधनकारक; मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल

Marathi Language | मराठी वर्किंग नॉलेज बंधनकारक; मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल

| Updated on: Apr 24, 2026 | 2:12 PM

महाराष्ट्रात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. राज्य सरकारने 1 मेपासून या नियमाची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली असून, चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधणं बंधनकारक करण्याचा प्रस्ताव पुढे सरकवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. राज्य सरकारने 1 मेपासून या नियमाची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली असून, चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधणं बंधनकारक करण्याचा प्रस्ताव पुढे सरकवण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध करत राज्यातील ऑटो आणि टॅक्सी चालक संघटनांनी 4 मेपासून संपावर जाण्याचा इशारा दिला असल्याने सरकार या निर्णयावर पुनर्विचार करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, राज्य परिवहन आयुक्तांनी मराठी सक्तीबाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला असून, त्यानुसार मसुदा अधिसूचना काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 4, 78 आणि 85 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव असून, चालकांसाठी मराठी भाषेचे ‘वर्किंग नॉलेज’ अनिवार्य करण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रस्तावित बदलांनुसार, सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याचा परवाना देताना अर्जदाराच्या पार्श्वभूमीसोबतच मराठी भाषेचं ज्ञान तपासलं जाणार आहे. तसेच, परवाना नूतनीकरणाच्या वेळीही मराठीचे ज्ञान आवश्यक राहील.
या निर्णयामुळे प्रवाशांशी सुसंवाद साधणं सुलभ होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत असला, तरी विरोधकांच्या भूमिकेमुळे हा मुद्दा अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

 

Published on: Apr 24, 2026 02:12 PM
Follow Us