Iran–Israel War | विमानतळ आणि सरकारी इमारतींनाही सोडलं नाही… इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला

Iran–Israel War | विमानतळ आणि सरकारी इमारतींनाही सोडलं नाही… इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला

| Updated on: Feb 28, 2026 | 1:57 PM

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढत होता. या तणावाचे परिणाम म्हणून इराणवर मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून केला आहे. यामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. इस्त्रायलने इराणच्या अनेक भागांवर हल्ले केले आहेत. इराणने “युद्ध तुम्ही सुरु केलं, युद्ध आम्ही संपवणार” असा इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढत होता. या तणावाचे परिणाम म्हणून इराणवर मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून केला आहे. यामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. इस्त्रायलने इराणच्या अनेक भागांवर हल्ले केले आहेत. इराणने “युद्ध तुम्ही सुरु केलं, युद्ध आम्ही संपवणार” असा इशारा दिला आहे. ह्या हल्ल्याला ऑपरेशन “शिल्ड ऑफ जुदा” असं नाव देण्यात आलं आहे. तसेच, अमेरिका दूतावासाने नागरिकांना इराणबाबत अलर्ट जारी केले आहेत. अमेरिकेच्या सैन्यांनी सीरियातून मिसाईल हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यांत मेहराबाद विमानतळावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, तसेच काही सरकारी इमारतींना लक्ष्य केले गेले आहे. इस्त्रायलकडूनही बॅलिस्टिक मिसाईल हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याचे परिणाम पाहण्यासाठी जागतिक लक्ष लागले आहे.

Published on: Feb 28, 2026 01:57 PM
Follow Us