Vaishnavi Hagawane Case : हगवणेंच्या मोठ्या सुनेला सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ कॉल

Vaishnavi Hagawane Case : हगवणेंच्या मोठ्या सुनेला सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ कॉल

| Updated on: May 22, 2025 | 7:28 PM

Supriya Sule Video Call To Mayuri Hagawane : हगवणे यांच्या मोठ्या सुनेने देखील आता पुढे येत आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी तिला व्हिडीओ कॉल केला.

वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर हगवणे यांच्या मोठ्या सुनेने देखील राजेंद्र हगवणे आणि संपूर्ण कुटुंबाचा पडदाफाश केलेला आहे. मयूरी जगताप हिला देखील हगवणे कुटुंबाकडून मारहाण करण्यात आलेली होती. मयूरीने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केलेले आहेत. यावेळी मयूरीने तिला झालेल्या मारहाणीचे फोटो देखील माध्यमांना दाखवले आहेत. या संपूर्ण प्रकरणात तिने पोलिसांना वारंवार तक्रार करून देखील पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचं मयूरीने सांगितलं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मयूरी जगताप हिच्याशी फोनवर संवाद साधला आहे. यावेळी मयूरीचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया देत तिला धीर देखील दिला. राज्यातल्या कोणत्याही मुलीवर अन्याय झाला तर तुम्ही तिच्यासाठी आदर्श बनून समोर उभ्या रहाल. तुम्ही वयाने लहान असूनही ज्या हिमतीने तुम्ही सर्व समोर आणलं त्याचा मला अभिमान आहे, असंही यावेळी बोलताना सुळे यांनी म्हंटलं.

Published on: May 22, 2025 07:28 PM