मोठी बातमी! PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; तांत्रिक चूक म्हणत मागितली माफी

मोठी बातमी! PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; तांत्रिक चूक म्हणत मागितली माफी

| Updated on: Jul 28, 2026 | 3:36 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत फेसबुक व्हिडिओला तात्पुरते हटवल्याच्या घटनेनंतर आता मेटाने याबाबत स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे. तांत्रिक अडचणीमुळे हा व्हिडिओ चुकून हटवला गेला होता आणि तो आता पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याचं मेटाकडून सांगण्यात आलं आहे.

मेटाच्या स्पष्टीकरणानुसार, ही कारवाई कोणत्याही धोरणात्मक कारणामुळे नव्हे, तर तांत्रिक त्रुटीमुळे झाली होती. संबंधित समस्या लक्षात येताच व्हिडिओ पुन्हा उपलब्ध करून देण्यात आला असून, झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने खेद व्यक्त केला आहे.

दरम्यान, या घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या अधिकृत व्हिडिओला तात्पुरते हटवण्यात आल्यामागील कारणांचा सखोल तपास केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर, या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी मेटाच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना व्हिडिओ हटवण्यामागील कारणे आणि तांत्रिक प्रक्रियेबाबत माहिती सादर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेंट व्यवस्थापन, तांत्रिक त्रुटी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या जबाबदारीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Jul 28, 2026 3:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us