Sanjay Raut Press | जय श्रीराम म्हणा, सर्व काही मिळेल; गॅस टंचाईवरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतातही दिसू लागला आहे. एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकही अडचणीत सापडले आहेत. अनेक गॅस एजन्सींच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी बुकिंग करूनही गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. या परिस्थितीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतातही दिसू लागला आहे. एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकही अडचणीत सापडले आहेत. अनेक गॅस एजन्सींच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी बुकिंग करूनही गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
या परिस्थितीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याबद्दल त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. देशात अशी गंभीर परिस्थिती असताना पंतप्रधान प्रचारासाठी केरळ आणि तामिळनाडू येथे कसे व्यस्त राहू शकतात, असा सवालही त्यांनी केला. राऊत म्हणाले की, देशात गॅस टंचाईसारखे महत्त्वाचे प्रश्न असताना सरकारचे लक्ष निवडणुकांवर अधिक दिसत आहे. त्यांनी टोला लगावत म्हटले की, “नमो नमो किंवा जय श्रीराम म्हणा, म्हणजे सर्व समस्या सुटतील आणि पेट्रोल-डिझेलही घरपोच मिळेल,” असे म्हणत त्यांनी सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. देशातील वाढत्या अंधभक्तीमुळे खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही राऊत यांनी सांगितले. दरम्यान, गॅस टंचाईचा प्रश्न लवकर सोडवावा, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.
