मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार? उद्धव ठाकरेंनी मध्यरात्री घेतली देवेंद्र फडणवीसांची गुप्त भेट; काय घडतंय?

मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार? उद्धव ठाकरेंनी मध्यरात्री घेतली देवेंद्र फडणवीसांची गुप्त भेट; काय घडतंय?

| Updated on: Apr 25, 2026 | 12:06 PM

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री झालेल्या कथित भेटीची चर्चा सध्या राज्यात रंगली आहे. एका ट्विटच्या माध्यमातून या भेटीचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसने सूत्रांच्या आधारे दोन्ही नेत्यांची वर्षा निवासस्थानी मध्यरात्री भेट झाल्याचा दावा केला आहे. मात्र, या भेटीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय समीकरणे आकार घेत आहेत. अशातच ठाकरे आणि फडणवीस यांची संभाव्य भेट ही मोठ्या राजकीय घडामोडींचा संकेत मानली जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत या दोन्ही नेत्यांमधील राजकीय मतभेद आणि युती तुटल्यानंतरचे तणाव आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेतील निवृत्त आमदारांच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांमध्ये शेरोशायरीच्या माध्यमातून संवाद झाला होता.
या पार्श्वभूमीवर, मध्यरात्रीच्या कथित भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे विधानपरिषद निवडणूक लढवणार की नाही, यावर आधीच चर्चा सुरू असताना, या भेटीमुळे पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Apr 25, 2026 12:06 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us