आश्रय दिला आणि घरच गेलं; एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर मनपाचा बुलडोझर
नाशिक धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपानंतर एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मतीन पटेल यांच्या कथित अनधिकृत बांधकामावर बुलडोझर कारवाई सुरू केली असून, या प्रकरणामुळे शहरातील नारेगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ज्या घरात निदा खानला लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे, ते घरही प्रशासनाच्या रडारवर असून ते देखील जमीनदोस्त करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 478(2) अंतर्गत मतीन पटेल यांना नोटीस बजावली होती. संबंधित बांधकाम 24 तासांत स्वतः हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. यावर मतीन पटेल यांनी मुदतवाढीची मागणी करत स्पष्टीकरण सादर केले होते. मात्र, प्रशासनाने त्यांचे उत्तर असमाधानकारक ठरवत कारवाईचा निर्णय कायम ठेवला.
दरम्यान, न्यायालयाकडूनही कोणताही दिलासा न मिळाल्याने आज पहाटे महापालिकेचे पथक बुलडोझरसह घटनास्थळी दाखल झाले. कारवाईची शक्यता लक्षात घेऊन मतीन पटेल यांनी स्वतः काही अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.
या कारवाईदरम्यान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, विशेष बाब म्हणजे स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या कारवाईचे स्वागत करत अधिकाऱ्यांवर फुलांची उधळण केली. काही नागरिकांनी उपायुक्तांना हार घालण्याचाही प्रयत्न केला. महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, संबंधित व्यक्तीने पूर्ण बांधकाम हटवले नाही तर उर्वरित बांधकाम प्रशासनाकडून पाडले जाईल आणि त्याचा खर्चही संबंधित नगरसेवकाकडून वसूल केला जाईल.