
Mira Bhayandar MNS Morcha :अखेर मनसेचा मोर्चा मीरा रोड स्थानकाच्या दिशेने निघाला
Mira Bhayandar MNS Morcha LIVE : आधी परवानगी नाकारण्यात आलेला मनसेचा मोर्चा सुरू झाला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे) ला मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यास सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, आता मुंबईसह बोरीवली, कांदिवली आणि आसपासच्या परिसरातील मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मीरा-भाईंदरकडे निघाले आहेत. मनसे नेते अभिजीत पानसे यांच्या नेतृत्वाखाली मीरा रोडवर हा मोर्चा सुरू झाला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मनसे कार्यकर्त्यांना एका हॉलमध्ये ठेवले होते, परंतु या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे सुरक्षा कवच तोडून बाहेर पडत मोर्चासाठी पुन्हा एकवटण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे मीरा-भाईंदर परिसरातील राजकीय वातावरण तणावपूर्ण बनले आहे. या मोर्चात केवळ मनसे कार्यकर्तेच नाही तर सामान्य मराठी माणूस देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे. त्यामुळे मोर्चाच्या ठिकाणी मोठी गर्दी झालेली बघायला मिळत आहे.
Published on: Jul 08, 2025 1:09 PM
Related Video
सापाच्या या भागात अडकलेला असतो जीव, चुकूनही मार लागताच होतो मृत्यू
देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठं कारस्थान, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची...
ठाकरेंचा ओमराजेंबद्दल मोठा गौप्यस्फोट, म्हणाले आदल्या रात्री...
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, किती धावा करणार?
तर ओमराजेंना तिकीटच दिले नसते, उद्धव ठाकरेंची तोफ धाराशीवमध्ये कडाडली!
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,