तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
आमदार हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामन खोसकर यांच्यावर त्र्यंबकेश्वर शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र भोये यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेची कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून, भोये यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. टीव्ही ९ मराठी या ऑडिओची पुष्टी करत नाही.
आमदार हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामन हिरामण खोसकर यांच्यावर त्र्यंबकेश्वर येथील शिवसेना तालुका प्रमुख (शिंदे गट) रवींद्र भोये यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी एक कथित कॉल रेकॉर्डिंग समाजमाध्यमांवर व्हायरल झाली असून, त्यात वामन खोसकर रवींद्र भोये यांना धमकावत असल्याचे ऐकू येते.
रवींद्र भोये यांनी या संदर्भात नाशिक ग्रामीण पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडून आमदार चिरंजीवांचे चुकीचे कामकाज उघड केले जात असल्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे. तू तेव्हा वाचला आहे, तू आता वाचणार नाही अशा शब्दांत त्यांना धमकी दिल्याचे भोये यांचे म्हणणे आहे. लोकशाहीमध्ये अशा पद्धतीची दमदाटी सहन केली जाणार नाही, असे सांगत भोये यांनी वामन खोसकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, टीव्ही ९ मराठी या व्हायरल झालेल्या ऑडिओची स्वतंत्रपणे पुष्टी करत नाही. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
