मनसेचं शिष्टमंडळ आज औरंगाबादमध्ये, सभेच्या परवानगीसाठी पोलीस आयुक्तांना भेटणार

मनसेचं शिष्टमंडळ आज औरंगाबादमध्ये, सभेच्या परवानगीसाठी पोलीस आयुक्तांना भेटणार

| Updated on: Apr 27, 2022 | 9:46 AM

राज ठाकरे यांची एक मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. मात्र या सभेला अद्यापपर्यंत पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळावी यासाठी मनसेचं शिष्टमंडळ आज औरंगाबादमध्ये येणार असून, ते पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे.

राज ठाकरे यांची एक मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. मात्र या सभेला अद्यापपर्यंत पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळावी यासाठी मनसेचं शिष्टमंडळ आज औरंगाबादमध्ये येणार असून, ते पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे. मनसेच्या सभेला परवानगी द्यावी अशी मागणी ते पोलीस आयुक्तांकडे करणार आहेत, या शिष्टमंडळामध्ये मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह दाहा ते बारा जणांचा समावेश आहे. आज पाच वाजता मनसे नेते पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.