MNS : अर्धनग्न अन् दारूच्या नशेत महिलेला शिवीगाळ, मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा भर रस्त्यात धिंगाणा, बघा VIDEO
व्हायरल व्हिडीओमध्ये राहिल शेख हा अर्धनग्न अवस्थेत महिलेला शिवीगाळ करताना दिसतोय. इतकंच नाहीतर तिला धमकी दिलीये. “xxx पैसे घे. जा आणि पोलिसांना सांग.. मी जावेद शेखचा मुलगा आहे. मग काय होईल ते तुला दिसेल”, अशी धमकी त्याने महिलेला दिली.
अर्धनग्न अवस्थेत असलेल्या मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा भर रस्त्यात धिंगाणा पाहिला मिळाला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मनसे पदाधिकारी जावेद शेख यांचा मुलगा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे हिला दारूच्या नशेत शिवीगाळ करताना दिसत आहे. मनसे पदाधिकारी जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख हा अर्धनग्न आणि दारूनच्या नशेत असलेल्या गाडी चालवत होता. यावेळी त्याने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे हिच्या गाडीला धडक दिली. इतकं नाहीतर या प्रकारानंतर राजश्री मोरे हिने जाब विचारला असता राहिल शेखने तिलाच शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील अंधेरी परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली आहे.
Published on: Jul 07, 2025 12:51 PM
