पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?

पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 13, 2026 | 2:30 PM

पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोजवळ गेल्या महिन्यात झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर गायकवाड कुटुंबावर आणखी एक दु:खद प्रसंग ओढावला आहे. या दुर्घटनेत नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूला अवघा एक महिना होत असतानाच त्यांच्या पत्नी सोनाली नागेश गायकवाड यांनीही काल रात्री टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली गायकवाड या पतीच्या मृत्यूमुळे मानसिक तणावात होत्या. पतीच्या निधनाचा धक्का त्या सहन करू शकल्या नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काल रात्री त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. ही घटना समोर आल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक आणि शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला.

गेल्या महिन्यात 8 जुलै रोजी मोशी कचरा डेपो परिसरात एक इमारत कोसळली होती. या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली सुमारे 15 जण अडकल्याची माहिती समोर आली होती. घटनेची माहिती मिळताच आर्मी, अग्निशमन दल, NDRF, पोलीस प्रशासन आणि विविध आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जवळपास दोन ते तीन दिवस बचावकार्य सुरू होते. या मोहिमेत काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, मात्र काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याच दुर्घटनेत नागेश गायकवाड यांचाही मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी सोनाली आणि दोन मुली असा परिवार होता. नागेश यांच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात झाला होता. मात्र आता पतीच्या निधनानंतर महिनाभरातच सोनाली यांचाही मृत्यू झाल्याने त्यांच्या दोन मुलींवर आई-वडिलांचे छत्र हरपले आहे.

या घटनेनंतर गायकवाड कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी MIDC भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Published on: Aug 13, 2026 2:30 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us