मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध

मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध

| Updated on: Aug 26, 2026 | 9:53 PM

मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तालुक्याची बदनामी होत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी मुळशी बचाव समिती स्थापन केली आहे. या समितीने गावोगावी ठराव घेऊन आपला निषेध नोंदवण्यास सुरुवात केली आहे. मुळशी पॅटर्न हा मराठी सिनेमा गाजला असला, तरी त्याच्या दुसऱ्या भागाच्या नावाला स्थानिकांचा आक्षेप आहे. पूर्वीच्या सिनेमामुळे मुळशीचे नाव देशभर पोहोचले […]

मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तालुक्याची बदनामी होत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी मुळशी बचाव समिती स्थापन केली आहे. या समितीने गावोगावी ठराव घेऊन आपला निषेध नोंदवण्यास सुरुवात केली आहे. मुळशी पॅटर्न हा मराठी सिनेमा गाजला असला, तरी त्याच्या दुसऱ्या भागाच्या नावाला स्थानिकांचा आक्षेप आहे.

पूर्वीच्या सिनेमामुळे मुळशीचे नाव देशभर पोहोचले असले, तरी त्याला गुन्हेगारीचा तालुका अशी कुप्रसिद्धी मिळाल्याचे स्थानिकांचे मत आहे. सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे हे स्वतः मुळशीचे रहिवासी असल्याने, त्यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.

मुळशी हा वारकरी, धारकरी आणि गडकोट किल्ल्यांचा तालुका आहे, गुन्हेगारांचा नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मुठा खोऱ्यामध्ये ९० टक्के सुशिक्षित लोक असून, मुळशी तालुक्याने पुणे शहर आणि महाराष्ट्राला अनेक चांगले अधिकारी व खेळाडू दिले आहेत. पहिल्या सिनेमाने व्यवसाय केला, पण मुळशीची बदनामी झाली, असे स्थानिकांचे स्पष्ट मत आहे.

Published on: Aug 26, 2026 9:53 PM
Follow Us