दादर चौपाटी परिसरात धूळ आणि धुक्याची दाट चादर! हवेची गुणवत्ता खालावली

| Updated on: Feb 25, 2026 | 10:59 AM

मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे, विशेषतः दादर चौपाटी परिसरात धूळ आणि धुक्याची दाट चादर पसरली आहे. AQI 170 ते 220 पर्यंत पोहोचल्याने हवेची गुणवत्ता खालावली असून PM 2.5 कणांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली असून पालिकेच्या स्वच्छ हवा मोहिमेअंतर्गत कारवाईनंतरही प्रदूषणात वाढ कायम आहे.

मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये पुन्हा एकदा प्रदूषणात वाढ नोंदवण्यात आली आहे. दादर चौपाटी परिसरात धूळ आणि धुक्याची दाट चादर पसरलेली दिसत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आजचा एक्यूआय (AQI) 170 ते 220 पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवेची गुणवत्ता पाहिली असता, PM 2.5 कणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

एकीकडे प्रदूषणात वाढ होत असताना, दुसरीकडे महानगरपालिकेकडून प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पालिकेने स्वच्छ हवा मोहीम अंतर्गत ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत मुंबईतील हजारो बांधकामांना काम बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, तरीही हवेची गुणवत्ता आणि प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. सध्या बाहेर पडताना मास्क वापरण्याच्या सूचना हवामान खाते आणि डॉक्टरांकडून नागरिकांना दिल्या जात आहेत.

Published on: Feb 25, 2026 10:59 AM