Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर… एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने… पहा व्हिडीओ

Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर… एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने… पहा व्हिडीओ

| Updated on: Jul 15, 2026 | 1:03 PM

मुंबईतील कोस्टल रोडवर झालेल्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. बोगद्याच्या परिसरात अनेक वाहनांची एकमेकांना धडक झाली. या घटनेनंतर एका वाहनातून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघातानंतर कोस्टल रोडवरील वाहतूक तातडीने थांबवण्यात आली. विशेषतः नरीमन पॉईंटवरून कोस्टल रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे हजार दोन हजार गाड्या या बोगद्यात अडकल्या असून सर्व उलट दिशेने मागे येत असल्याचंही सांगितलं जात आहे.

घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन पथक तातडीने दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काम सुरू केले. बोगद्यामध्ये शेकडो वाहने अडकून पडल्याने अनेक नागरिक वाहनांच्या बाहेर उतरून परिस्थितीची माहिती घेताना दिसले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

Published on: Jul 15, 2026 1:02 PM
Follow Us