Mumbai Fatkar Morcha | शिवसैनिक-भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा, अक्षता तेंडुलकर-श्रद्धा जाधव यांची लाईव्ह प्रतिक्रिया

Mumbai Fatkar Morcha | शिवसैनिक-भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा, अक्षता तेंडुलकर-श्रद्धा जाधव यांची लाईव्ह प्रतिक्रिया

| Updated on: Jun 16, 2021 | 8:41 PM

भाजपच्या नेत्या अक्षता तेंडुलकर यांनी शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला आहे (Mumbai Fatkar Morcha Akshata Tendulkar and Shradhha Jadhav reaction).

मुंबई : राम मंदिराच्या कथित जमीन (Ram Mandir Land) घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन आज मुंबईत तुफान धुमश्चक्री झाली. शिवसेना आणि भाजप (Shiv Sena BJP) कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर प्रचंड हाणामारी केली. यावेळी भाजपच्या महिला नेत्यांना मारहाण करण्यात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपच्या नेत्या अक्षता तेंडुलकर यांनी शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. पण त्यांचा आरोप शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी फेटाळला आहे. या दोघी महिला नेत्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला लाईव्ह प्रतिक्रिया दिली. (Mumbai Fatkar Morcha Akshata Tendulkar and Shradhha Jadhav reaction)

Published on: Jun 16, 2021 08:39 PM