Mumbai Local Mega Block News | दादर स्थानकावर प्रचंड गर्दी… एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा खोळंबा
मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचं ठिकाण असलेल्या एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे दादर स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आहे. ब्लॉक असल्याने आज सेट्र्ल मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल गाड्या आज दादर पर्यंतचं धावात आहेत.
मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचं ठिकाण असलेल्या एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे दादर स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आहे. ब्लॉक असल्याने आज सेट्र्ल मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल गाड्या आज दादर पर्यंतचं धावात आहेत. एल्फिस्टन पुलाचं काम सुरु असल्यामुळे हा ब्लॉक लावण्यात आला होता. हा ब्लॉक रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत लावण्यात आला होता मात्र सकाळच्या ७ पर्यंत एल्फिस्टन पुल सुरु करण्यात आले नाही. या ब्लॉकमुळे प्रवाशांना प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यावेळी अंबरनाथ, आसनगाव तसेच कर्जतच्या ट्रेनदेखील दादरस्थानकावरुन पुन्हा वळवल्या जात आहेत. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेससुद्धा आज उशीराने धावत आहेत. अनेक इतर रेल्वे स्थानकांवरदेखील या ब्लॉकचा मोठा परिणाम होत आहे. दादरवरील वाढत्या गर्दीमुळे प्रवाशी बेहाल झाले असून रेल्वे प्रशासन दिलगीर असल्याचं सांगत आहे. हा ब्लॉक आणखी किती वेळ असेल? रेल्वे वाहतुक कधी सुरळीत होईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
