स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल
मुंबई लोकल ट्रेनमधून जीवघेणा प्रवास करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दाराबाहेर लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या व्हायरल व्हिडीओंमुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशासनाकडून यावर कधी उपाययोजना केली जाईल, असा सवाल प्रवासी विचारत आहेत.
मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवासाचा एक गंभीर आणि जीवघेणा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रवासी अक्षरशः लोकलच्या दाराबाहेर लटकून प्रवास करताना दिसत आहेत. मुंबईसारख्या शहरात दररोज हजारो प्रवासी लोकलने प्रवास करतात आणि त्यापैकी अनेक जण जागेअभावी किंवा गर्दीमुळे धोकादायक पद्धतीने प्रवास करण्यास भाग पडतात. हा व्हायरल झालेला व्हिडीओ मुंबईतील लोकल प्रवासातील भीषण वास्तवाचे दर्शन घडवतो.
अशा प्रकारे धोका पत्करून प्रवास केल्याने अनेकदा भीषण अपघात घडतात आणि प्रवाशांना आपले जीव गमवावे लागतात. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अजून किती बळी घेणार? आणि आणखी जीव जाण्याची वाट प्रशासन बघत आहे का? असे संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारले जात आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून असे धोकादायक प्रवास करणे हे गंभीर आणि चिंताजनक आहे. रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास थांबवण्यासाठी कठोर पाऊले उचलणे आवश्यक आहे.
