Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडेंची वर्णी!
भाजपने मुंबई महापौरपदासाठी नगरसेविका रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली आहे, तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून संजय घाडी उपमहापौर पदाचे उमेदवार असतील. घाटकोपरमधील गुजराती बहुल मतदारसंघातून दोनदा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या रितू तावडे या शिक्षण समितीच्या अध्यक्षाही होत्या. आज दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करतील.
भाजपने मुंबईच्या महापौरपदासाठी नगरसेविका रितू तावडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा केली. घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक 132 मधून दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या रितू तावडे यांची ओळख शिक्षण समितीच्या माजी अध्यक्ष आणि ईशान्य मुंबईतील भाजपचा आक्रमक चेहरा अशी आहे.
त्याचबरोबर, शिंदे गटाच्या शिवसेनेकडून संजय घाडी उपमहापौर पदाचे उमेदवार असतील. उपमहापौर पद सव्वा वर्षांसाठी असणार आहे. मनपा कार्यालयात भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीत दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले. आज अर्ज भरण्याच्या प्रक्रियेनंतर पुढील चित्र स्पष्ट होईल.
Published on: Feb 07, 2026 11:33 AM
