एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन…

| Updated on: Aug 07, 2026 | 1:12 PM

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा मेसेज मिळाल्याने खळबळ उडाली आहे. ‘१५ जण पंजाबमार्गे RDX घेऊन भारतात येत आहेत’, असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. तसेच दिल्ली, नोएडा आणि कानपूर या शहरांमध्ये काही लोक विखुरले असल्याचा उल्लेखही या धमकीच्या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

या धमकीच्या मेसेजची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मेसेज नेमका कुठून आणि कोणी पाठवला, तसेच त्यातील दावे कितपत खरे आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आलेल्या या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अधिक तपास सुरू आहे.

Published on: Aug 07, 2026 1:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us