Sanjay Raut Press | जनआक्रोश मोर्च्यावरून वाद चिघळला; स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपने राज्यभरात काढलेल्या जनआक्रोश मोर्च्यावरून राजकीय वाद अधिकच तीव्र झाला आहे. मुंबईतील जांबोरी मैदान परिसरात झालेल्या या मोर्चामुळे मोठी गर्दी झाली आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे संतप्त झालेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारत संताप व्यक्त केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण अधिकच चर्चेत आलं आहे.
महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपने राज्यभरात काढलेल्या जनआक्रोश मोर्च्यावरून राजकीय वाद अधिकच तीव्र झाला आहे. मुंबईतील जांबोरी मैदान परिसरात झालेल्या या मोर्चामुळे मोठी गर्दी झाली आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे संतप्त झालेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारत संताप व्यक्त केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण अधिकच चर्चेत आलं आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी, “मोर्चांमुळे अशा घटना घडत असतात. यापूर्वीही 50 किलोमीटरपर्यंत हायवे जॅम झाल्याची उदाहरणे आहेत,” असं म्हटलं. तसेच, संबंधित महिलेने वापरलेली भाषा अयोग्य असल्याचं सांगत आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. “मोर्चाचे आयोजक तुम्हीच आहात, मग स्वतःविरुद्ध गुन्हा दाखल करणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “महिला आरक्षणाचा ठोस मुद्दा नसताना महिलांना भ्रमित करून मोर्चा काढला गेला आणि नागरिकांना अडचणीत टाकलं,” असा आरोपही त्यांनी केला. राऊत यांनी पुढे सांगितलं की, “त्या महिलेने शेकडो महिलांच्या भावना व्यक्त केल्या. तिच्या संतापामागचं कारण समजून घ्यायला हवं.” तसेच, विरोधकांना मोर्चासाठी परवानगी मिळवताना अनेक अडथळे येतात, मात्र सत्ताधाऱ्यांना त्वरित परवानगी मिळते, असा आरोप करत राऊतांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.