महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राजभवनातून भाजपचं कार्यालय चालतंय : नाना पटोले
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून सुरू असलेली टीका टिप्पणी अजूनही सुरूच आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून सुरू असलेली टीका टिप्पणी अजूनही सुरूच आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राजभवनमधून भाजपचे कार्यालय सुरू असल्याची खोचक टीका नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना ही टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र दिले. त्याची दखल घेवून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राजभवनमधून भाजपचे कार्यालय चालत आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
