एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क…

एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क…

| Updated on: Aug 26, 2026 | 12:24 PM

नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजपने जोरदार बॅनरबाजी केली आहे. फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांवर पक्षाने या बॅनरद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. "पार्टी योग्य निर्णय घेईल, काळजी नसावी" आणि "देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार" अशा घोषणा देत विरोधकांना लुडबूड न करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजपने मोठी बॅनरबाजी केली आहे. फडणवीस दिल्लीत जातील अशा चर्चांना यामुळे भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या बॅनरवर “पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, तूर्तास काळजी नसावी” असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरमध्ये “काल, आज आणि उद्या देवाभाऊंच्या (देवेंद्र फडणवीस) नेतृत्वात महाराष्ट्र सरकार” असा संदेश देण्यात आला आहे. तसेच, “ढोंगी हितचिंतकांनी काळजी करू नये” असेही नमूद करून अप्रत्यक्षपणे विरोधकांना इशारा दिला आहे.

संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांचा उल्लेख करत, विरोधकांना महाराष्ट्रात कोणतीही संधी मिळत नाही आणि भविष्यातही दिसणार नाही, असे या बॅनरमधून सांगण्यात आले आहे. अशा ढोंगी हितचिंतकांनी लुडबूड करू नये, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी हे बॅनर लावल्याचे भाजपने म्हटले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस हे आज गरजेचे असल्याचेही या बॅनरमधून अधोरेखित करण्यात आले आहे.

Published on: Aug 26, 2026 12:24 PM
Follow Us