Marathi News Videos Narayan Rane's bungalow Supreme Court orders demolition of Adheesh bungalow in Juhu

नारायण राणेंचा अधीश बंगला पाडणार? 10 लाख रुपये दंड, सुप्रीम कोर्टाचे आदेश काय?
नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याच्या बांधकामात अनियमितता असल्याने ते पाडण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
संदीप राजघोळकर, नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court) एका निर्णयाचा फटका बसला आहे. नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील अधीश बंगल्याच्या बांधकामात अनियमितता असल्याचं हे प्रकरण आहे. महापालिकेच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने (Highcourt) या प्रकरणी दिलेला निर्णय कायम ठेवण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, तसेच 10 लाख रुपये दंड भरावेत, असे आदेश यापूर्वी उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशाविरोधात राणे यांच्याकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली. नारायण राणे हे दंड भरणार का, तसच अवैध पद्धतीने झालेलं बांधकाम पाडणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Published on: Sep 26, 2022 1:38 PM
Related Video
Flipkart वर मोटोरोला एज 70 प्रो प्लसची विक्री सुरू, मिळवा घसघशीत सूट
8000mAh बॅटरीचा पॉवरफूल तगडा 5G फोन लाँच, भन्नाट आहेत फिचर्स
श्रीलंकेसमोर पहिल्याच सामन्यात यजमान इंग्लंडचं आव्हान
1 ट्रॉफी, 2 ग्रुप, 12 संघ-33 सामने, 12 जूनपासून वर्ल्ड कप स्पर्धा
वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालमाल, बक्षिस रक्कमेबाबत मोठा निर्णय
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Bhandara : नाना पटोले यांनी घेतला गावरान आंबे आणि जांभळाचा आस्वाद
लासलगावमधील कुक्कुटपालन केंद्रात सापाची सुटका
पुणे - एकादशी निमित्त आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक आरास
पुणे - खेड तालुक्यातील भीमा नदीवरील पुलाला गेल्या तीन वर्षांपासून मोठे भगदाड
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताई मंदिरात एकादशीनिमित्त गर्दी