Nashik TCS Case | नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग…..निदा खानला 11 मेपर्यंत पोलीस कोठडी
नाशिकमधील धर्मांतर आणि फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी निदा खानला आज न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने तिला 11 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, या काळात तिची सखोल चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात महत्त्वाची माहिती मांडली. त्यांनी सांगितले की, निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज 2 मे रोजी फेटाळण्यात आला होता. त्यानंतर ती फरार होती. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक केली.
नाशिकमधील धर्मांतर आणि फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी निदा खानला आज न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने तिला 11 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, या काळात तिची सखोल चौकशी केली जाणार आहे.
या प्रकरणात सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात महत्त्वाची माहिती मांडली. त्यांनी सांगितले की, निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज 2 मे रोजी फेटाळण्यात आला होता. त्यानंतर ती फरार होती. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक केली. महिला आरोपी असल्याने आणि सूर्यास्तानंतर अटक झाल्यामुळे न्यायालयाची परवानगी घेऊन तिला नाशिकला आणण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारी पक्षाने न्यायालयाकडे 7 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला 11 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान, तपासादरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. पीडितेला धर्मांतराच्या उद्देशाने धमकावण्यात आले होते. तिला बुरखा देण्यात आला होता तसेच नमाज आणि हिजाब याबाबत प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणात निदा खानची नेमकी भूमिका काय होती आणि यामध्ये आणखी कोण सहभागी होते का, याचा तपास सुरू असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले.
तसेच, पीडितेच्या मोबाईलमध्ये चिथावणीखोर रिल्स टाकण्यात आल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन नमाज आणि बुरख्यासंदर्भात दबाव टाकल्याचाही आरोप असून, पोलिसांकडून या सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे.
