Nashik | नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने 2.16 कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिक शहरात शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवत पाच जणांची तब्बल 2 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 20 टक्क्यांपर्यंत नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत आरोपींनी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले आणि त्यानंतर मोठी रक्कम उकळल्याचे समोर आले आहे.
नाशिक शहरात शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवत पाच जणांची तब्बल 2 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 20 टक्क्यांपर्यंत नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत आरोपींनी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले आणि त्यानंतर मोठी रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधितांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना आकर्षक परताव्याच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.
Published on: Feb 19, 2026 04:57 PM
