Nashik Onion | युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका; JNPT बाहेर 150 हून अधिक कंटेनर अडकले

Nashik Onion | युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका; JNPT बाहेर 150 हून अधिक कंटेनर अडकले

| Updated on: Mar 02, 2026 | 4:40 PM

अमेरिका, इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे थेट परिणाम आता नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर दिसून येत आहेत. नाशिकमधून निर्यातीसाठी पाठवण्यात आलेले सुमारे 150 हून अधिक कंटेनर सध्या मुंबईतील Jawaharlal Nehru Port Authority (JNPT) बाहेर अडकून पडले आहेत.

अमेरिका, इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे थेट परिणाम आता नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर दिसून येत आहेत. नाशिकमधून निर्यातीसाठी पाठवण्यात आलेले सुमारे 150 हून अधिक कंटेनर सध्या मुंबईतील Jawaharlal Nehru Port Authority (JNPT) बाहेर अडकून पडले आहेत. नाशिकमधील कांदा आखाती देशांमध्ये इस्त्रायल, दुबई, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथे निर्यात केला जातो. या निर्यातीसाठी कांदा प्रथम मुंबईतील JNPT बंदरावर पाठवला जातो आणि तेथून तो पुढे आखाती देशांकडे रवाना केला जातो. दुबईमार्गे या मालाची पुढील वाहतूक होत असल्याने दुबईतील सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम निर्यातीवर झाला आहे. दुबईमधील वाहतूक आणि बंदर सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्याने JNPT वरून दुबईकडे जाणारे कंटेनर बाहेरच अडकले आहेत. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचा कांदा सध्या अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून पर्यायी मार्ग किंवा आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Published on: Mar 02, 2026 04:40 PM
Follow Us