Anil Kadam | मतांच्या गणितात आम्ही… अनिल कदमांचं बेधडक विधान; नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट येणार?
नाशिकमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेतील फाटाफुटीनंतर नाशिक पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. 2022 साली शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत विभागणी झाली. एक मोठा गट सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटासोबतही काही कार्यकर्ते कायम आहेत. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आता राजकीय समीकरणे बदललेली दिसत आहेत.
नाशिकमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेतील फाटाफुटीनंतर नाशिक पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. 2022 साली शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत विभागणी झाली. एक मोठा गट सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटासोबतही काही कार्यकर्ते कायम आहेत. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आता राजकीय समीकरणे बदललेली दिसत आहेत.
दरम्यान, निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सक्रिय आहेत. महायुतीकडून एकत्रितपणे निवडणूक लढवली जात असून 17 पैकी 17 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीही निवडणुकीच्या रिंगणात आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही मविआचा भाग आहे. नाशिकमधून उद्धव ठाकरे गटाने उमेदवार दिलेला नाही. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिल कदम विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा होती. याबाबत त्यांनी TV9 मराठीशी संवाद साधला.
या संवादादरम्यान, “एकनाथ शिंदेंची शिवसेना आमची पहिली शत्रू आहे, त्यामुळे समोर भाजपचा उमेदवार असेल तर त्याला मदत करणार का?” या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “संजय राऊत आमचे नेते आहेत, ते जे बोलले त्यावर मी बोलू इच्छित नाही.” निवडणूक व वास्तव यावर भाष्य करताना अनिल कदम म्हणाले, “मतांच्या गणितात आम्ही कमी आहोत. घोडेबाजार आणि निवडणुका हे एक समीकरण झाले आहे.” तसेच “कार्यकर्ता, व्हिजन, दृष्टी ही आता लोप पावत चालली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
मातोश्रीवरून उमेदवारी घेण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, “मातोश्री आणि माझं नातं वेगळं आणि अनोखं आहे. ते ऋणानुबंध कायम राहतील.”
