नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा, अखेर छत्रपती संभाजीनगरातून निदा खानला अटक
नाशिकमधील टीसीएस कंपनीशी संबंधित धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंड निदा खान हिला तब्बल 42 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातून तिला ताब्यात घेण्यात आले.
नाशिकमधील टीसीएस कंपनीशी संबंधित धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंड निदा खान हिला तब्बल 42 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातून तिला ताब्यात घेण्यात आले. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही अटक केली. निदा खान ही 25 मार्चपासून फरार होती आणि गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होती. सुरुवातीला ती ठाणे आणि मुंब्रा परिसरात लपल्याची माहिती समोर आली होती. मात्र, अखेर ती छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव येथील कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.
दरम्यान, निदा खानचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक मागील 24 तासांपासून सातत्याने शोधमोहीम राबवत होते. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत तिला अटक केली.
या प्रकरणामुळे राज्यभर मोठी खळबळ उडाली असून, धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे या प्रकरणाकडे विशेष लक्ष लागले आहे. पोलिसांकडून आता निदा खानची सखोल चौकशी करण्यात येत असून, या प्रकरणातील इतर संबंधितांचीही माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.