Pune Nasrapur Case Updates | नसरापूर प्रकरणातील आरोपीसह पोलिसांची मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी, पुढे काय घडलं?
पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली. आरोपीने दगडाने ठेचून चिमुकलीला ठार मारले, इतकेच नाही तर नंतर शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवले. या थरकाप उडवणाऱ्या घटनेनंतर शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत.
पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली. आरोपीने दगडाने ठेचून चिमुकलीला ठार मारले, इतकेच नाही तर नंतर शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवले. या थरकाप उडवणाऱ्या घटनेनंतर शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, अचानक मध्यरात्री पोलिसांनी आरोपी भीमराव कांबळे याच्यासह घटनास्थळाची सखोल पाहणी केली आहे.
अलीकडेच आरोपीच्या अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. प्रकरणातील पीडित बालिकेच्या शवविच्छेदनात आणखी एक गंभीर माहिती समोर आली आहे. आरोपीने चिमुरडीच्या छातीत बुक्याने मारल्याचे समोर आले आहे. आधीच्या एका अहवालात मुलीच्या छातीवर व्रण दिसत होते, मात्र ते नेमके कशामुळे आले हे स्पष्ट झालं नव्हतं. पोलिसांकडून करण्यात आलेल्या पाहणीत घटनेसंदर्भातील महत्त्वाचे धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे.
