नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही हे पाहण्यासाठी चक्क…
पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे निघत आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी लावून धरली जात आहे. संपूर्ण राज्यात संतापाचा कडेलोट झाला आहे. चिमुरडीसोबत जी अमानवीय घटना घडली त्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे निघत आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी लावून धरली जात आहे. संपूर्ण राज्यात संतापाचा कडेलोट झाला आहे. चिमुरडीसोबत जी अमानवीय घटना घडली त्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी, नराधम भीमराव कांबळेला कठोर शिक्षा व्हावी, अशी स्थानिकांकडून तसेच अनेक नेत्यांकडून मागणी केली जात आहे. पोलीस प्रशासनही या प्रकरणाने खडबडून जागे झाले, या प्रकरणासंबंधित सखोल तपासासाठी पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेले. यावेळी त्याने अनेक गोष्टींची कबुली दिली.
या तपासात समोर आले की, आरोपी भीमराव कांबळे अत्याचाराआधी बराच काळ गोठ्यातच थांबून होता. यावेळी त्याने मुलीचा जीव गेला आहे की नाही हे पाहण्यासाठी तिच्या छातीत जोरदार बुक्की मारली होती. पोलिसांकडून घटनास्थळी जाऊन केलेल्या तपासात हा हादरवणारा घटनाक्रम समोर आला आहे.
पोलिसांना चौकशी दरम्यान आरोपीने थंड डोक्याने सांगितले की, ‘अत्याचाराच्या दिवशी मी नशेत होतो, म्हणून हे घडले.’ आरोपी स्वतःच्या बचावासाठी असे बोलत असल्याचा संशय आहे.
