एकच खळबळ! सलग 14 सोशल मीडिया आकाउंट्सवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

एकच खळबळ! सलग 14 सोशल मीडिया आकाउंट्सवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 18, 2026 | 11:07 AM

भाजपचे सोशल मीडिया सहसंयोजक निखिल भागरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्याविरोधात सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या आणि बदनामीकारक पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या एफआयआर अंतर्गत आज 17 जुलै 2026 रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात BNS कलम 319(2), 356(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे.

भाजपचे सोशल मीडिया सहसंयोजक निखिल भागरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, नवनाथ बन यांचे नाव, छायाचित्र आणि भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते म्हणून असलेली ओळख वापरून फेसबुक, इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट प्रसारित करण्यात आल्या.

या पोस्टमुळे नवनाथ बन यांची प्रतिमा मलीन करण्याचा, समाजात त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण करण्याचा आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात 14 वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सचा स्पष्ट उल्लेख FIR मध्ये करण्यात आला असून, संबंधित अकाउंट्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून डिजिटल पुरावे तपासले जात असून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Published on: Jul 18, 2026 11:07 AM
Follow Us