डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?

डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?

| Updated on: Jul 15, 2026 | 12:38 PM

महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून केंद्र सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी हे विधेयक मंजूर झालं नव्हतं. मात्र आता पावसाळी अधिवेशनात हेच विधेयक पुन्हा मांडण्याची तयारी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून केंद्र सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी हे विधेयक मंजूर झालं नव्हतं. मात्र आता पावसाळी अधिवेशनात हेच विधेयक पुन्हा मांडण्याची तयारी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, INDIA आघाडीतील काही प्रमुख पक्षांचा आधी विरोध होता. मात्र, काही अटी आणि शर्तींसह अनेक पक्ष या विधेयकांना पाठिंबा देण्यास तयार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इतर विरोधी पक्षांनीही सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” सुत्रांमुळे काही माहित्या पसरवू नका, पक्षाने अजून अधिकृत भूमिका मांडलेली नाही मात्र, मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेत देशातील जागांमध्ये 50 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादी शरद पवार गट इंडिया आघाडीतील इतर नेत्यांशीही चर्चा करेल आणि नंतर ठरवेल. त्यामुळे हातात बिल आलेलं नाही तोपर्यंत काही बोलण्याचा पश्न येत नाही. 50 टक्के आरक्षणाचा कॅप जर आला तर आम्ही विचार करू”

Published on: Jul 15, 2026 12:20 PM
Follow Us