NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णपणे ब्रेक; पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णपणे ब्रेक; पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

| Updated on: Nov 15, 2026 | 10:49 AM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस डीलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असून, यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने मतदारसंघ वाढवण्याच्या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या भूमिकेचे स्वागत केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कोणतेही विलिनीकरण होणार नसल्याचे दोन्ही गटांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांनी या चर्चांना आधीच फुलस्टॉप लावला होता. तसेच, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यावरही विलिनीकरणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड म्हणून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारच्या डीलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना आणि वाढ करण्याच्या या विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा असेल, असे स्वतः सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या भूमिकेचे स्वागत केले. मात्र, या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण काँग्रेसने मतदारसंघ वाढवण्याच्या या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. मतदारसंघ वाढवण्याऐवजी आहे त्याच मतदारसंघात डीलिमिटेशन करावे, अशी काँग्रेसची मागणी आहे.

 

Published on: Nov 15, 2026 10:49 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us