Sunetra Pawar : जशी वेळ येईल तशा…; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा कधी उठणार?

Sunetra Pawar : जशी वेळ येईल तशा…; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा कधी उठणार?

| Updated on: Nov 12, 2026 | 8:10 AM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळात वेग घेतला आहे. सुनैत्रा पवार यांनी जशी वेळ येईल तशा गोष्टी कळतील असे सूचक विधान करत सस्पेन्स वाढवला आहे. तर संजय राऊतांनी अजित पवार गटातील २०-२२ आमदार फुटणार असल्याचा दावा केला असून, यावर उमेश पाटलांनी खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना ऐन दिवाळीत पुन्हा एकदा उधाण आले आहे. या चर्चांनी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडी, दिल्लीतील भेटीगाठी, तसेच शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील चर्चांमुळे काहीतरी मोठे घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या पार्श्वभूमीवर, सुनेत्रा पवार यांनी सूचक वक्तव्य करत सस्पेन्स वाढवला आहे. “जशी वेळ येईल तशा गोष्टी कळतील,” असे त्यांनी म्हटले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. दुसरीकडे, संजय राऊत यांनी अजित पवार गटातील २० ते २२ आमदार कधीही बाहेर पडतील, असा मोठा दावा केला आहे. ते शरद पवार साहेबांना भेटत असून, अजित पवारांचे नेतृत्व राहिलेले नाही आणि त्यांना गुलामी करावी लागत असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. मात्र, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी राऊतांच्या या दाव्याची खिल्ली उडवली आहे.

या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल शरद पवार आणि सुनेत्रा पवारच सांगू शकतात, असे ते म्हणाले. भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Nov 12, 2026 8:05 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us