tv9 Marathi Special Report | दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं; दादांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा खळबळजनक दावा

tv9 Marathi Special Report | दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं; दादांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा खळबळजनक दावा

| Updated on: Feb 14, 2026 | 2:41 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीनीकरणाच्या चर्चेत अजित पवारांच्या पक्षातील काही नेते अजूनही इच्छुक नसताना, काही नेते उघडपणे विलिनीनीकरणाच्या बाजूने समोर येत आहेत. आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले की, 70% आमदार विलिनीनीकरणाच्या बाजूने सुनेत्रा पवार यांच्याकडे भूमिका मांडणार आहेत. तसेच, दादांच्या राष्ट्रवादीचे नेते अतुल बेनके यांनी जुन्नरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीनीकरणाच्या चर्चेत अजित पवारांच्या पक्षातील काही नेते अजूनही इच्छुक नसताना, काही नेते उघडपणे विलिनीनीकरणाच्या बाजूने समोर येत आहेत. आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले की, 70% आमदार विलिनीनीकरणाच्या बाजूने सुनेत्रा पवार यांच्याकडे भूमिका मांडणार आहेत. तसेच, दादांच्या राष्ट्रवादीचे नेते अतुल बेनके यांनी जुन्नरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा केली आहे. विलीनीनीकरणाच्या प्रक्रियेत दादांच्या राष्ट्रवादी पक्षाचे दोन नेते उघडपणे बाजू घेतल्याचे दिसून येत आहे. हिरामण खोसकर यांनी म्हटले की, “विलीनीनीकरण 100% पूर्ण व्हायला हवे.” अजित पवार मुंबईत दर मंगळवारी आमदारांची बैठक घेत होते, सुनेत्रा पवार देखील आमदारांना भेटत आहेत. आगामी मंगळवारी होणाऱ्या बैठकीत 70% आमदार विलिनीनीकरणाच्या बाजूने भूमिका मांडणार आहेत, असे खोसकर यांनी सांगितले.

Published on: Feb 14, 2026 02:41 PM