शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? बातमीला दुजोरा; बड्या नेत्यानं म्हटलं, लवकरच…

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? बातमीला दुजोरा; बड्या नेत्यानं म्हटलं, लवकरच…

Harshada Shinkar | Updated on: Feb 14, 2024 | 1:35 PM

शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची बातमी समोर आली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. मात्र शरद पवार गटाकडून या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे.

पुणे, १४ फेब्रुवारी २०२४ : शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची बातमी समोर आली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. मात्र शरद पवार गटाकडून या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी या होणाऱ्या चर्चांवर भाष्य केले आहे. शरद पवार आजच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पक्षाला विलीन करण्याचा निर्णय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे. तशी चर्चा सुरू आहे. मात्र लवकरच कळेल… वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील, असे मंगलदास बांदल म्हणाले. दरम्यान, आगामी लोकसभा, राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी त्यांच्या पक्षातील सर्व आमदार आणि खासदार यांची बैठकही बोलावली आहे. शरद पवार लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे,रोहित पवार,अमोल कोल्हे, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत.

Published on: Feb 14, 2024 1:35 PM
Follow Us