NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर; वाचा पेपर नेमका कसा फुटला?

NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर; वाचा पेपर नेमका कसा फुटला?

| Updated on: May 12, 2026 | 6:09 PM

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी म्हणजेच डॉक्टर होण्यासाठी असणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर आता ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आगामी काळात ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. आता प्रशासनाने या कथित पेपरफुटीचा तपासही सुरू केला आहे.

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी म्हणजेच डॉक्टर होण्यासाठी असणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर आता ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आगामी काळात ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. आता प्रशासनाने या कथित पेपरफुटीचा तपासही सुरू केला आहे. या पेपरफुटीत नाशिक कनेक्शन समोर आले आहे. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी नाशिकमध्ये असल्याची राजस्थान पोलिसांनी नाशिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा युवक नाशिकमध्ये राहणारा असल्याचे समोर आले. 30 वर्षीय संशयित शुभम खैरनार हा आरोपी BAMS चे शिक्षण घेत होता. हा आरोपी मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रहिवासी आहे. राजस्थान CBI कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिक गुन्हे शाखेने दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्याला ठाण्याचा हद्दीत ताब्यात घेतले आहे. ओळखता येऊ नये यासाठी त्याने केसंही कापली होती.

या आरोपीने पेपर इकडून तिकडे देण्यासाठी फक्त मध्यस्थाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. यासाठी 10 लाखांचा पेपर 15 लाखांना विकण्याचा संशयही आहे. नंतर हा पेपर इन्स्टाग्रामवर लीक झाला. आता या प्रकरणातील आणखी लोकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Published on: May 12, 2026 06:09 PM
Follow Us