Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा

Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा

| Updated on: Sep 07, 2026 | 10:51 AM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी निवडणुकीतील मतदानाच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

नितीन गडकरी यांनी आपल्या निवडणुकीतील मतदानाबाबत बोलताना, सुशिक्षित भागांपेक्षा क्रिमिनल, अंडरवर्ल्ड आणि रेड लाईट एरियामधून अधिक मतदान मिळाल्याचा दावा केला. सुशिक्षित भागांमधून आपल्याला 70 ते 75 टक्के मतदान मिळालं, तर क्रिमिनल आणि अंडरवर्ल्डशी संबंधित भागांमध्ये तब्बल 92 टक्के मतदान मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

मात्र, या मतदानाचा अर्थ संबंधित व्यक्तींशी आपले संबंध आहेत किंवा त्यांच्या कामाला आपण समर्थन देतो, असा काढू नये, असं गडकरी यांनी स्पष्ट केलं. या भागांमध्ये आपण रस्ते आणि विविध सामाजिक कामं केली असल्यामुळे तेथील नागरिकांनी आपल्याला मतदान केल्याचं त्यांनी सांगितलं.

गडकरींच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलं असून, त्यांच्या विधानावर विविध राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

Published on: Sep 07, 2026 10:51 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us