कोणत्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

कोणत्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

| Updated on: Aug 23, 2024 | 4:37 PM

महाविकास आघाडीने उद्या ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र बंद'चे आवाहन केले आहे. मात्र या बंदला उच्च न्यायालयाने बेकायदा होणार आहे. त्यामुळे आता शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार या बंद संदर्भात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीने उद्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. यासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखले केली होती. या याचिकेवर शुक्रवार दुपारी सुनावणी झाली.मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उद्याचा बंद बेकायदेशीर ठरविला आहे. कोणालाही अशा प्रकारचा बंद पुकारता येणार नाही. बंद केला तर अशा पक्षांवर कारवाई करण्याचे आादेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कोर्टाचा हा आदेश महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा आहे. तरीही महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं तर राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे.या महाराष्ट्र बंदला बेकायदेशीर ठरविण्यात आल्याने आता उद्याचा महाराष्ट्र बंद यशस्वी होतो की नाही ? आणि राज्य सरकार उद्या शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर उद्या काय कारवाई करते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 23, 2024 4:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us