Sanjay Gaikwad : कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी शिंदेंच्या आमदारावर मोठी अ‍ॅक्शन, संजय गायकवाडांवर….

Sanjay Gaikwad : कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी शिंदेंच्या आमदारावर मोठी अ‍ॅक्शन, संजय गायकवाडांवर….

Harshada Shinkar | Updated on: Jul 11, 2025 | 5:34 PM

आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

संजय गायकवाड यांच्याविरोधामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गायकवाडांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. मारहाण प्रकरणात संजय गायकवाड यांची पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. यासाठी कुणाचीही तक्रार येण्याची गरज नाही. दखलपात्र गुन्हा असेल तर पोलीस त्याची चौकशी करतील. असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. गायकवाडांविरोधात तक्रार दाखल नसल्यामुळे चौकशी करता येणार नाही, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले होते. फडणवीसांनी कारवाईच्या अनुषंगाने वक्तव्य केल्यानंतर कारवाईला घाबरत नसल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार असल्याचही गायकवाड यांनी सांगितलं. बनियान टॉवेल गॅंगचे नेतृत्व गायकवाडांनी केलंय, असं म्हणत राऊतांनी कारवाईची मागणी केली. तर हे माझं साधं राहणीमान असून राऊतांनी अक्कलेचे तारे तोडले असं म्हणत गायकवाड यांनी राऊतांवर पलटवार केलाय.

Published on: Jul 11, 2025 5:34 PM
Follow Us